सीमाभागात ऊस आंदोलन पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:24 IST2018-11-20T00:24:27+5:302018-11-20T00:24:32+5:30

उदगांव : सीमाभागातील साखर कारखान्यांनी मागील ४00 रुपये व चालू हंगामातील उसाचा दर जाहीर न करता कारखाना सुरू केल्याच्या ...

The sugarcane agitated over the border | सीमाभागात ऊस आंदोलन पेटले

सीमाभागात ऊस आंदोलन पेटले

उदगांव : सीमाभागातील साखर कारखान्यांनी मागील ४00 रुपये व चालू हंगामातील उसाचा दर जाहीर न करता कारखाना सुरू केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सीमाभागातील ऊस आंदोलन चांगलेच पेटले आहे.
अथणी, कागवाड, रायबाग, जमखंडी, मुडलगी, चिकोडीसह तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्रित येऊन बेळगाव-विजापूर महामार्गावर सुमारे सहाशेहून अधिक उसाची वाहने गेल्या तीन दिवसांपासून रोखून धरली आहेत. रविवारी मध्यरात्री २७ वाहने पेटवून शासनाचा निषेध केला. त्यामुळे सीमाभागातील गावागावांत आंदोलनाचे पेव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
कर्नाटकातील साखर कारखान्याने गतहंगामात २९०० रुपये दर दिला होता. त्यापैकी २५०० रुपये शेतकऱ्यांना आठ ते नऊ महिन्यांनी दिले व उर्वरित ४०० रुपये अद्याप दिलेले नाहीत. तसेच सध्या होऊ घातलेल्या गळीत हंगामातील एफआरपी जाहीर न करता कारखाने सुरू केले आहेत. मात्र, कोणत्याही शेतकरी संघटनेला विश्वासात न घेता कर्नाटक सरकार व कारखानदारांनी शेतकºयांची मक्तेदारी मोडून काढून कारखाने सुरू केले आहेत. याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक संघटना यांच्यावतीने कर्नाटक सीमाभागात गेल्या १५ दिवसांपासून ऊस आंदोलन सुरू आहे.

Web Title: The sugarcane agitated over the border