शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची होतेय विक्री, कारखानदारांची अळीमिळीगुपचिळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:22 IST

Sugar Market News : साखरेचा किमान विक्रीदर वाढत नसल्याने एफआरपी देणे, तसेच खेळत्या भांडवलाचीही कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री चालू केली आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : साखरेचा किमान विक्रीदर वाढत नसल्याने एफआरपी देणे, तसेच खेळत्या भांडवलाचीही कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री चालू केली आहे. कागदोपत्री मात्र ३,१०० रुपये प्रति क्विंटलनेच व्यवहार दाखविला जात आहे. यात साखर कारखान्यांना क्विंटलमागे दीडशे ते दोनशे रुपयांचा तोटा होत आहे. अशा व्यवहारांबाबत कारखानदार-व्यापारी अधिकृतपणे मौन धारण करीत असले तरी, खासगीत याशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय नसल्याचे मान्य करतात. साखरेला कारखान्याच्या दारात (एक्स मिल) ३,१०० रुपये प्रतिक्विंटल दर केंद्र सरकारने निश्चित केलेला आहे. यापेक्षा कमी दराने विक्री केल्यास सरकार कारवाई करू शकते. देशात सध्या अतिरिक्त साखर आहे. त्यामुळेच इथेनॉल निर्मितीवर भर देण्याला सरकार प्रोत्साहन देत आहे. तरीही साखर अतिरिक्त असल्याने आणि बाजारात उठाव नसल्याने साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलाची टंचाई जाणवत आहे. सध्या २,९०० ते ३,००० रुपये क्विंटल दराने ही साखर विकली जात आहे. साखरेचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च ३,६०० ते ३,७०० रुपये आहे. विक्रीदर वाढीचा  निर्णय कधी?साखरेचा किमान विक्री दर ३,८०० रुपये प्रति क्विंटल करावा, अशी मागणी कारखानदारांनी केलेली आहे. सरकारने हा दर ३,३०० रुपये करण्याचे सूतोवाच केले होते. अन्न मंत्रालयाने तसा प्रस्तावही केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सादर केला होता. मात्र चार-पाच महिने उलटले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातही याबाबत कसलाही उल्ले‌ख नाही. त्यामुळे साखरेचा दर कधी वाढणार, असा सवाल कारखानदार करीत आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करू नये यासाठी आम्ही कारखानदारांकडे आग्रह धरीत आहोत; पण नाइलाज म्हणून काही कारखाने असा प्रकार करीत आहेत. त्यांची संख्या खूप कमी आहे.    - बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया     शुगर मिल्स असोसिएशन

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र