शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील हंगामात साखर उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:07 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाच्या काही भागात पडलेला दुष्काळ आणि उसावर पडलेला लोकरी मावा यामुळे ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाच्या काही भागात पडलेला दुष्काळ आणि उसावर पडलेला लोकरी मावा यामुळे पुढील गळीत हंगामात उसाचे उत्पादन, तसेच उताराही कमी होणार असल्याने देशातील साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांच्या आत येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांतील हे निचांकी उत्पादन असेल.जगात ब्राझीलबरोबर भारत सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश आहे. भारतात २०१७-१८ च्या हंगामात ३२२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू हंगामातही ३१५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. देशाची गरज २६० लाख टन साखरेची असल्याने सध्या देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर बनला आहे.ही साखर कमी करण्यासाठी सरकारने ५० लाख टन निर्यातीचे लक्ष्य ठेवले असले तरी या हंगामात सुमारे ३० लाख टनांपर्यंतच साखरेची निर्यात होईल, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळे पुढील हंगामाच्या सुरुवातीला देशात १२५ लाख टनांहून जादा साखर शिल्लक असणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन घटले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.याबाबत राष्टÑीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, देशाच्या काही भागात विशेषत: महाराष्टÑ आणि कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती असल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. तसेच उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने उताऱ्यातही घट होणार आहे. परिणामी,२०१९-२०च्या साखर हंगामात साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांच्या आत राहील, असा अंदाज आहे.इथेनॉलचा परिणाम दीड ते दोन वर्षांनीअतिरिक्त साखरेवर उपाय म्हणून सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. इथेनॉल प्रकल्प उभारणी, तसेच आधुनिकीकरणासाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत.उसाचे उत्पादन घटल्यास या प्रकल्पांवर किंवा या प्रकल्पांचा साखरेच्या उत्पादनावर काही परिणाम होईल का, असे विचारता उभारणी सुरू असलेल्या प्रकल्पांतून इथेनॉल निर्मिती सुरू होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील हंगामात याचा काहीही परिणाम होणार नाही, असे नाईकनवरे यांनी सांगितले.साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांची वाढदरम्यान , साखरेचा किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केल्याने बॅँकांनी साखरेवरील उचलीतही वाढ केली आहे. मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ झाली असून, १२.५ टक्के उताºयाला ३२९३ रुपये उचल मिळणार आहे. बॅँकांकडून मिळणारी उचल, उपपदार्थांच्या पैशामुळे कारखानदारांना एफआरपी देण्यासाठी थोडासा दिलासा मिळाला असला, तरी एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांची दमछाकच होणार आहे.