शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रतिटन १०० रुपये टाका, अन्यथा टाळे ठोकू; स्वाभिमानी संघटना पुन्हा आक्रमक 

By विश्वास पाटील | Updated: February 7, 2024 16:41 IST

कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० ...

कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० रूपये, व ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिला आहे त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा मान्य करण्यात आलेला होता. त्याप्रमाणे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी येत्या आठवड्याभरात तातडीने शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांचेकडे करण्यात आली. यामुळे तातडीने साखर कारखान्यांना गत हंगामातील दुसरा हप्ता शेतक-यांच्या खात्यावर एक आठवड्यात वर्ग करण्यात यावा अन्यथा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर सहसंचालक कार्यालयास कोणतीही पुर्वसुचना न देता  ठाळे ठोकून व साखर कारखान्यांची साखर अडवून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी प्रा.डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सागर शंभुशेटे, राजाराम देसाई, धनाजी पाटील, विठ्ठल मोरे, राम शिंदे, संपत मोरे , अण्णा मगदूम यांचेसह पदाधिकारी ऊपस्थित होते.गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग  १० तास रोखून धरला होता. यावेळेस कोल्हापूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी शासनाबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० रूपये व ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिला आहे त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा मान्य करण्यात आलेला होता.  साखर सहसंचालक कार्यालयात प्रभारी अधिकारी गोपाळ मावळे यांना चांगलेच धारेवर धरले. सोमवारपर्यंत शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता टाळे टोकणार असल्याचे ठणकावून सांगितले.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये ३१ जानेवारी अखेर चालू गळीत हंगामातील क्रांती साखर कारखान्याची ४० कोटी , वारणा कारखाना २७ कोटी , आजरा १० कोटी , भोगावती ६ कोटी , हुतात्मा १४ कोटी , सदाशिवराव मंडलिक ९ कोटी , कुंभी ५ कोटी , रूपयाची एफ. आर. पी थकविण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून  दोन महिन्याच्या आत परवानगी घेऊन साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेवतीने जिल्हाधिकारी यांनी लेखी हमी पत्राद्वारे कळविले आहे. हंगाम सुरू होवून दोन महिने उलटून गेले तरीही याबाबत शासन अथवा कारखानदारांकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. शासनाकडून व कारखानदार यांचेकडून जाणीवपुर्वक वेळकाढूपणा केला जात असून यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झालेले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाcollectorजिल्हाधिकारी