शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ऊसतोड मजुरांची दिवाळी यंदाही आपल्या गावातच

By admin | Updated: October 21, 2014 23:41 IST

१ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद

संदीप बावचे - जयसिंगपूर -साखर कारखान्यांच्या धुराडी १५ नोव्हेंबरनंतरच पेटणार असल्यामुळे यंदाही ऊसतोड मजुरांची दिवाळी आपापल्या गावांतच साजरी होणार आहे. १ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत आहे. अन्य शेतकरी संघटना व शिवसेना यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून राहिले आहे. त्यातच ऊस मजुरांच्या टोळ्या आणण्याबाबत अजूनही वाहनधारकांना कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याही नजरा धुराडी पेटण्याकडे लागल्या आहेत.ऊसदराच्या प्रश्नावरून गतवर्षी साखर कारखानदारी अडचणीत आली होती. शेतकरी संघटना व शिवसेनेने उसाच्या पहिल्या उचलीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ऊस वाहतूकदार दुहेरी चिंतेत होते. आंदोलनापासून वाहन सुरक्षित ठेवणे, ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कामापासून किती दिवस थांबणार, अशी चिंता वाहनधारकांना होती. मात्र, ‘थांबा आणि पहा’ अशी भूमिका कारखानदारांनी ठेवल्यामुळे वाहनधारकांनी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आणल्या नव्हत्या. यामुळे दरवर्षी ऊस हंगामाच्या ठिकाणी दिवाळी सण साजरा करणाऱ्या ऊसतोडणी मजुरांनी आपल्या गावातच हा सण साजरा केला.यंदा १५ नोव्हेंबरनंतरच साखर कारखान्यांच्या धुराडी पेटणार अशीच चिन्हे आहेत. १ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहे. या ऊस परिषदेत पहिल्या उचलीबाबत कोणता निर्णय होणार, आंदोलनाची दिशा काय ठरणार, हाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. त्यातच शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटना आणि शिवसेना या चारही संघटना आंदोलनाचा पवित्रा कितपत घेतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे. ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळणार का? हादेखील विषय महत्त्वाचा आहे. या सर्व चक्रात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रकमालक चिंतेत आहेत.