कारखान्याने या हंगामामध्ये राबविलेल्या थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसह विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी केली. तसेच कारखान्याची वीजनिर्मिती, बायोडायजेस्टर प्रकल्प याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, शाहू साखर कारखान्याने सहकारी साखर कारखानदारीमध्ये आपल्या उत्कृष्ट नियोजनाचा ठसा उमटविला आहे. तो इतर कारखान्यांना आदर्शवत आहे. साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविण्याच्या मागे न लागता शाहू साखर कारखान्याप्रमाणे नवनवीन प्रकल्प उभारणी करावी.
स्वागत उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले, तर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.
..........
कागल येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी समरजित घाटगे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, वीरेंद्रसिंह घाटगे उपस्थित होते.