शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुडा झाला; लग्नापूर्वीच प्लॉट, दुकानगाळ्यासाठी मुलगा अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:40 IST

कोल्हापूर : मोठ्या डामडौलामध्ये मुलीचा साखरपुडा करून दिला अन् लग्नाची तारीख निश्चित करताना नवरा मुलाच्या नावे प्रथम लग्नापूर्वी एक ...

ठळक मुद्देकेर्लीतील नियोजित वरासह सातजणांवर गुन्हा : लग्न मोडण्याची धमकी देण्याचाही प्रकार

कोल्हापूर : मोठ्या डामडौलामध्ये मुलीचा साखरपुडा करून दिला अन् लग्नाची तारीख निश्चित करताना नवरा मुलाच्या नावे प्रथम लग्नापूर्वी एक गुंठा जमीन व औषधविक्री व्यवसायासाठी दुकानगाळा खरेदी करून द्या, असा तगादा मुुलीच्या वडिलांकडे लावल्याचा प्रकार घडला. हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी केर्ली (ता. करवीर) येथील नियोजित वर निखिल संभाजी मोहिते, त्याचे वडील संभाजी रामचंद्र मोहिते यांच्यासह एकूण सातजणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उच्चशिक्षित मुलीचे लग्न केर्ली येथील नियोजित वर निखिल मोहिते याच्याशी ठरले होते. ठरल्याप्रमाणे मुुलीच्या वडिलांनी नोव्हेंबरमध्ये हॉलमध्ये योग्य मानपानात थाटामाटात साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर सुमारे चार महिन्यांनी मार्चमध्ये लग्नाची तारीख निश्चित केली; पण साखरपुड्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी मुलाच्या वडिलांनी अ‍ॅँजिओग्राफीसााठी मुुलीच्या घरच्यांकडून ५० हजार रुपये घेतले. पुढे लग्नसमारंभासाठी मुलीच्या वडिलांनी कार्यालयही बुक केले; पण त्यानंतर मुलाकडील नातेवाइकांनी लग्नासाठी टोलवाटोलवी केली. मुलीच्या चारित्र्यावर नाहक संशय व्यक्त केला. लग्नापूर्वीच एक गुंठा प्लॉट व औषधविक्री व्यवसायासाठी मुलाच्या नावे दुकानगाळा खरेदी करून द्या, अन्यथा लग्न मोडले जाईल, अशी धमकी दिली.हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ती तक्रार एमआयडीसी शिरोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. तक्रारीनुसार मुलासह सातजणांवर गुन्हा नोंदविला आहे.गुन्हा नोंद झालेल्यांची नावेमुलगा निखिल मोहिते, त्याचे वडील संभाजी रामचंद्र मोहिते, आई आशा मोहिते, भाऊ सर्जेराव मोहिते यांच्यासह नामदेव रंगराव पाटील (सर्व रा. केर्ली, ता. करवीर), स्वाती रामचंद्र तळेकर, बाजीराव रामचंद्र तळेकर (दोघेही रा. सावरवाडी, ता. करवीर) यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.स्वत:च पत्र लिहून मुलीची बदनामीमुलीची आमच्याकडे कोणीतरी प्रेमपत्रे पाठविली असल्याचे मुलाकडील लोकांनी सांगून मुलीची बदनामी केली. विशेष म्हणजे साखरपुड्यावेळी यादी करताना मुलाच्या दाजीचे हस्ताक्षर आणि मुलीच्या नावे दाखविलेल्या प्रेमपत्रातील मजकुराचे अक्षर एकसारखे असल्याचे दिसून आल्याचे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी