बालिंगा येथे घराला अचानक आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:56+5:302021-01-08T05:16:56+5:30

कोपार्डे : बालिंगा येथे घराला अचानक आग लागल्याने छतासह आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. फुलेवाडी येथील अग्निशमन दलाने आग ...

Sudden fire at a house in Balinga | बालिंगा येथे घराला अचानक आग

बालिंगा येथे घराला अचानक आग

कोपार्डे : बालिंगा येथे घराला अचानक आग लागल्याने छतासह आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. फुलेवाडी येथील अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. ही घटना दुपारी १२ वाजता घडली असून आगीचे कारण समजू शकले नाही.

बालिंगा येथील निवास महादेव वाडकर यांनी ग्रामपंचायत शेजारी असलेले आपले घर डॉ. संतोष रॉय यांना भाड्याने दिले आहे. डॉ. रॉय हे रहायला जवळच योध्या कॉलनीत आहेत. आज ओपीडी आटोपून दुपारी १२ वाजता डॉ. रॉय घरी गेले. घरी पोहचतात तोपर्यंत शेजाऱ्यांनी घरातून आग व धूर येत असल्याची माहिती डॉ. रॉय यांना दिली.ते तत्काळ दवाखान्यात आले असता घराच्या छपरातून आग व धुराचे लोळ बाहेर पडताना दिसले. त्या अगोदरच शेजाऱ्यांनी फुलेवाडी येथील अग्निशमन दलाला याची महिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी छतावर चढून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घराच्या पश्चिमेच्या बाजूला असणारे दोन खोल्यावरील संपूर्ण छप्पर जळून खाली कोसळले.

दवाखान्यात डॉ. रॉय यांनी ३० हजार रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग जळून खाक झाली. येथे असणारे साहित्यही जळून खाक झाले. असे एकूण तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

फोटाे

बालिंगा (ता. करवीर) येथे अचानक लागलेल्या आगीत घळाचे छप्पर, पैशाची बॅग जळून खाक झाली.

Web Title: Sudden fire at a house in Balinga