निवृत्त वायू सैनिकाची अशीही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST2021-07-28T04:26:48+5:302021-07-28T04:26:48+5:30

कोल्हापूर : येथील निवृत्त वायूसैनिक मुरलीधर देसाई यांनी दोन रुग्णांना पेन्शनमधील प्रत्येकी दोन हजार रुपये उपचारांसाठी देऊन वेगळीच बांधीलकी ...

Such help from a retired airman | निवृत्त वायू सैनिकाची अशीही मदत

निवृत्त वायू सैनिकाची अशीही मदत

कोल्हापूर : येथील निवृत्त वायूसैनिक मुरलीधर देसाई यांनी दोन रुग्णांना पेन्शनमधील प्रत्येकी दोन हजार रुपये उपचारांसाठी देऊन वेगळीच बांधीलकी जपली. कोणतेही संकट आले तर संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत जावून त्यांना मदत करण्यात देसाई यांचा पुढाकार असतो. जे आपल्याकडे आहे, त्यातील दोन घास इतरांच्या मुखात घालण्यासाठी त्यांची सतत धडपड असते.

दुर्मीळ आजाराने त्रस्त असलेला म्हाकवे (ता.कागल) येथील मानांक पाटील व एक डोळा गमावलेली मुरगूडची अनुष्का तोरसे यांना मदतीचे आवाहन करणाऱ्या बातम्या त्यांनी लोकमतमध्ये वाचल्यावर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या औषधोपचाराची आपली छोटीसी मदत म्हणून स्वत: बँकेत जावून त्यांनी ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली. दादूमामा ट्रस्टच्या माध्यमातून गेली सतरा-अठरा वर्षे ते या स्वरूपाची मदत करत आले आहेत.

Web Title: Such help from a retired airman