शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिवजयंतीची जय्यत तयारी; भव्य मिरवणुकांचे आयोजन, अमित शहांच्या हस्ते होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:55 IST

यंदा कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फेही प्रथमच भव्य मिरवणूक काढण्यात येणार

कोल्हापूर : अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंती उत्सवाची तयारी शहरात मोठ्या उत्साहाने सुरू आहे. वातावरणही शिवमय झाले आहे. विशेषतः मिरजकर तिकटी येथे २० फुटी सह्याद्रीचा कडा, तर उभा मारुती चौकात गडकोट ऐतिहासिक कमान बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मिरजकर तिकटीवरील मावळा ग्रुपच्या वतीने यंदा २५ बाय २५ असा भव्य सह्याद्रीचा कडा आणि त्यावरील मावळे असा देखावा उभारण्याचे काम सुरू आहे, तर गुरुवारी (दि.१६) छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ मूर्तीही मिरवणुकीने स्थानापन्न केली जाणार आहे. याशिवाय दि. १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान प्रतापगडचा शिवसंग्राम हे नाटक रोज पाच शो याप्रमाणे मावळा ग्रुपचे कलाकार शिवभक्तांसाठी सादर करणार आहेत.

ज्येष्ठ विचारवंत अ. ह. साळुंखे यांचा शाहू छत्रपती यांच्या हस्ते मावळा गौरव पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे. याशिवाय कोल्हापूरच्या महिला फुटबाॅलपटू, खेलो इंडियात चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वीस फुटी कटाउट ही उभारणीचे काम सुरू आहे.शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने यंदा उभा मारुती चौकात ऐतिहासिक गडकिल्ल्याची भव्य प्रतिकृती असलेली कमान उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरवणुकीने आणून स्थानापन्न केला जाणार आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भगवे झेंडे, फेटे आणि उपरणे विक्री स्टाॅलही महाद्वाररोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक आदी परिसरात जागोजागी उभारण्यात आले आहेत.भव्य मिरवणुकांची तयारीशिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे येत्या रविवारी शिवजयंती दिनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फेही प्रथमच भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यासह देशातील अनेक राज्यांतील वाद्य पथकांचा समावेश राहणार आहे. या मिरवणुकीची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती