वर्षाराणी पाटील , तेजस्विनी सूर्यवंशी यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:14+5:302021-02-05T07:06:14+5:30
पोखरा (नेपाळ ) येथे युथ स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया संचलित शहीद भगतसिंग स्पोर्ट्स फाउंडेशन इंडो-नेपाळ यांच्यावतीने पार पडलेल्या ...

वर्षाराणी पाटील , तेजस्विनी सूर्यवंशी यांचे यश
पोखरा (नेपाळ ) येथे युथ स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया संचलित शहीद भगतसिंग स्पोर्ट्स फाउंडेशन इंडो-नेपाळ यांच्यावतीने पार पडलेल्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये शिंपे ( ता . शाहूवाडी ) येथील वर्षाराणी कृष्णा पाटील हिने ५० किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णंपदक, तर मैदानी स्पर्धेत तेजस्विनी बळवंत सूर्यवंशी हिने ३००० मीटर धावणे स्पर्धत रौप्य पदक मिळवित यश संपादन केले . वर्षाराणी ही सरुड येथील श्री शिव -शाहू महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तर तेजस्विनी ही कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. या दोघीनाही राष्ट्रीय प्रशिक्षक गोरक्ष सकटे, कुस्ती प्रशिक्षक संभाजी भरणकर, प्रमोद पाटील, भरत नायकल, वडील कृष्णा पाटील, बळवंत सूर्यवंशी आदींचे मार्गदर्शन लाभले .
फोटो नावाने