माझ्याकडे जे आहे त्याचाच विचार केल्याने यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:36+5:302021-01-08T05:16:36+5:30
एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करायचे असेल तर सातत्य, आत्मविश्वास, एकाग्रता आणि कठीण मेहनत या गोष्टी आवश्यक ...

माझ्याकडे जे आहे त्याचाच विचार केल्याने यश
एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करायचे असेल तर सातत्य, आत्मविश्वास, एकाग्रता आणि कठीण मेहनत या गोष्टी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. खेळाडू सरावाआधी सरावानंतर काय खातात, आराम किती करतात याही गोष्ठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. योगा, स्टेचिग, वार्मअम करा. भरपूर पाणी प्या, रोज आपण काय केले याचे चिंतन करा, स्पर्धेच्या वेळेस ताणतणाव न घेता खंबीरपणे स्पर्धेत भाग घ्या, असा मंत्रही त्यांनी दिला. यावेळी प्रशिक्षक नीळकंठ आखाडे व जलतरण तलाव येथील विद्यार्थी उपस्थित होते.
कोट :
सध्या खेळाला चांगले दिवस असून, अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्त्व द्या, कोणत्याही खेळात सराव करताना तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करा. मन लावून करा, सरावाबरोबर आपल्या खाण्याकडे लक्ष द्या.
सूयश जाधव, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी
चौकट
आत्मविश्वास गरजेचा
एखाद्या स्पर्धेसाठी गेल्यानंतर आपला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही सराव खूप केलेला असतो; पण आत्मविश्वास नसल्यामुळे तुम्ही पराभूत होता. तसे होता कामा नये, आपले प्रशिक्षक जे सांगतील ते प्रत्येक खेळाडूने लक्षात घेऊन सराव केला पाहिजे, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.