निबंध व नाट्य स्पर्धेत सरस्वती हायस्कूलचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:33+5:302021-09-04T04:29:33+5:30
इचलकरंजी : जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा व शहरस्तरीय नाट्य स्पर्धेत येथील सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. पंडित जवाहरलाल ...

निबंध व नाट्य स्पर्धेत सरस्वती हायस्कूलचे यश
इचलकरंजी : जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा व शहरस्तरीय नाट्य स्पर्धेत येथील सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
पंडित जवाहरलाल नेहरू संस्था इस्पुर्ली संचलित जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत लहान गट (इयत्ता ५ वी ते ७वी) मध्ये वैष्णवी सूर्यकांत कोट्टलगी (प्रथम), मोठा गट (इयत्ता आठवी ते दहावी) मध्ये नेत्रा सूर्यकांत रेडेकर (द्वितीय). तसेच इनरव्हिल क्लबच्यावतीने आयोजित शहरस्तरीय नाट्यस्पर्धेत ऐश्वर्या शेळके, प्राची सारडा, प्राची कस्तुरे, पृथ्वीराज चौगुले, श्रद्धा पाटील या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, एम. ई. कांबळे, एस. आर. भाटे, जे. जी. कुलकर्णी, एस. एस. शिंदे, एस. सी. हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने, शिवाजी जगताप व पृथ्वीराज माने यांनी कौतुक केले.
फोटो ओळी
०३०९२०२१-आयसीएच-०१
जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत व शहरस्तरीय नाट्यस्पर्धेत सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.