सरस्वती हायस्कूलचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:07+5:302021-08-21T04:27:07+5:30
व्हिजन ग्रीन सिटीचा अनोखा उपक्रम इचलकरंजी : व्हिजन ग्रीन सिटीच्या वतीने अनोख्या पद्धतीने पर्यावरणपूरक रक्षाबंधन उत्सव साजरा करण्याचा संकल्प ...

सरस्वती हायस्कूलचे यश
व्हिजन ग्रीन सिटीचा अनोखा उपक्रम
इचलकरंजी : व्हिजन ग्रीन सिटीच्या वतीने अनोख्या पद्धतीने पर्यावरणपूरक रक्षाबंधन उत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राखीबरोबर झाडांच्या बिया मोफत देण्यात येणार असून, या बिया २४ तास कोमट पाण्यात भिजवून रोप तयार करावे, असे आवाहन केले आहे. या उपक्रमास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून, मागणीनुसार पर्यावरणपूरक राखी देण्यात येत आहे.
व्यंकटेश महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिर
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात योग प्रशिक्षण शिबिर झाले. जिमखाना विभाग व गर्ल्स फोरमच्या वतीने हे शिबिर आयोजित केले होते. प्राचार्य डॉ. विजय माने यांनी उद्घाटन केले. संस्कृती सारडा व सानिया बाणदार यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रा. अमिन बाणदार व ग्रंथपाल महेश केसरकर यांनी मार्गदर्शन केले.