शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

यूपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा डंका! सहा जणांनी मिळवले घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 17:30 IST

आशिष पाटील, फरहान जमादार, वृषाली कांबळे, आदित्य बामणे, आदिती चौगुले, सुशीलकुमार शिंदे यांचे यश

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जणांनी घवघवीत यश मिळवले. आशिष पाटील, फरहान जमादार, वृषाली कांबळे, आदित्य बामणे, आदिती चौगुले, सुशीलकुमार शिंदे यांनी युपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा लौकिक वाढवला.साळशी (ता. शाहूवाडी) येथील आशिष अशोक पाटील यांनी १४७ वी रँक प्राप्त केली. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी यशाला गवसणी घातली. कोल्हापुरातील कदमवाडी येथील फरहान जमादार याने १९१ रँक मिळवत यशाचा झेंडा रोवला. उत्तूर (ता.आजरा) येथील वृषाली संतराम कांबळे हिने ३१० वी रँक घेत या परीक्षेत यश मिळवले. जयसिंगपूर येथील आदिती संजय चौगुले हिने देशभरात ४३३ वी रँक मिळवली. पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २६ व्या वर्षी तिने हे यश संपादन केले.केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये घेतलेल्या नागरी मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात साळशी येथील आशिष अशोक पाटील यांनी यशाला गवसणी घातली. आशिष पाटील सध्या दिल्ली ,दीव- दमण या केंद्रशासित प्रदेशात उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी २०२२ मध्ये ४६३ तर २०२१ मध्ये ५६३ वी रँक मिळवली होती. आता देशात त्यांनी १४७ वी रँक मिळवली. कोल्हापुरातील कदमवाडीच्या कारंडे मळा येथे राहणाऱ्या फरहान इरफान जमादार याने दुसऱ्या प्रयत्नात यशाची कमान सर केली. कॉम्प्युटर अभियंता असलेल्या फरहान याने २०२१ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, त्यात खचून न जाता दुसऱ्यावेळी यश खेचून आणले. त्याच्या वडिलांचा प्रिंटिंगचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे.उत्तूर येथील मूळ रहिवासी असलेली पण सध्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या वृषाली कांबळे हिनेही या परीक्षेत ३१० वी रँक मिळवली. पॉलिटिकल सायन्सची पदवीधर असलेल्या वृषाली हिने तिसऱ्या प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला आहे. उत्तूर येथील आदित्य अनिल बामणे यांनी या परीक्षेत १०१५ वी रँक मिळवली. आदित्य हे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाले.

कोल्हापुरात अभ्यास करुन यशाचा डंकाबाहेरील जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी कोल्हापुरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. येथील विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करणाऱ्या यशवंत मंगेश खिलारी ४१४, सागर भामरे ५२३ आणि सिद्धार्थ तगड ८०९ या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळवले. जयसिंगपूर येथील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व निवासी केंद्रातील विद्यार्थिनी प्रांजली प्रमोद नवले हिने ८१५ वी रँक मिळवली. ती मूळची वाळवा तालुक्यातील आहे. कोल्हापुरातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये अभ्यास करणाऱ्या इंदापूरच्या शामल भगत या विद्यार्थिनीनेही यश मिळवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगResult Dayपरिणाम दिवस