आवाडे यांच्यामुळे निवडणुकीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:26+5:302021-07-18T04:18:26+5:30

इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे यांच्यामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यांनीच निवडणुकीपूर्वीच माझ्या नावाची घोषणा केली ...

Success in elections due to Awade | आवाडे यांच्यामुळे निवडणुकीत यश

आवाडे यांच्यामुळे निवडणुकीत यश

इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे यांच्यामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यांनीच निवडणुकीपूर्वीच माझ्या नावाची घोषणा केली होती आणि त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच माझी जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड पार पडली आहे. भविष्यातही आम्ही सगळे निश्‍चितपणे एकत्र येऊ, अशी अपेक्षा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी आणि शिक्षण-अर्थ समिती सभापती रसिका पाटील यांनी शनिवारी सहकारमहर्षी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. डीकेटीईत झालेल्या या कार्यक्रमास ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सन्मती बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील, जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, अमर पाटील, माणगावचे सरपंच राजू मगदूम, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, बाबासाहेब पाटील, चंद्रशेखर शहा, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले उपस्थित होते.

Web Title: Success in elections due to Awade