सहकार प्राधिकरणाचे यश : कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळमधील नऊ संस्थांच्या होणार निवडणुका

By Admin | Updated: December 10, 2014 00:17 IST2014-12-10T00:06:24+5:302014-12-10T00:17:36+5:30

जिल्ह्यातील ‘ड’ वर्गातील ३२६ संस्था झाल्या बिनविरोध

Success of Cooperative Authority: Elections to nine organizations in Kolhapur city, Karveer, Hatkanangle, Shirol | सहकार प्राधिकरणाचे यश : कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळमधील नऊ संस्थांच्या होणार निवडणुका

सहकार प्राधिकरणाचे यश : कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळमधील नऊ संस्थांच्या होणार निवडणुका

राजाराम लोंढे-कोल्हापूर  जिल्ह्यातील ‘ड’ वर्गातील ३२६ सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नऊ संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. ‘ड’ वर्गातील आठ संस्थांनी ‘क’ वर्गानुसार निवडणूक प्रक्रियेची मागणी केल्याने त्यांची प्रक्रिया सुरू केली आहे.
सहकार प्राधिकरणाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ‘ड’ वर्गातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. जिल्ह्णात आॅक्टोबर २०१४ अखेर ३८९ संस्था निवडणुकीस पात्र होत्या. त्यापैकी ३७२ संस्थांचे प्रस्ताव आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविले होते, त्यानुसार या संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका सभासदांच्या सर्वसाधारण सभेत हात वर करून बिनविरोध करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले होते. नोव्हेंबरअखेर या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यास प्राधिकरणाची डेडलाईन होती. त्यानुसार तालुका निबंधकांनी गेले महिनाभर निवडणूक प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये ३२६ संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात निबंधकांना यश आले आहे. नऊ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या वर्गातील आठ संस्थांनी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली तर काहींची सभासद संख्या दोनशेपेक्षा अधिक असल्याने ‘क’वर्गात समावेश करण्याची मागणी प्राधिकरणाकडे केल्याने त्यांचा समावेश ‘क’ मध्ये केला आहे. कोल्हापूर शहर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील संस्थांचा समावेश आहे.

‘क’ वर्गातील १९१ संस्थांची प्रक्रिया सुरू
मार्च २०१३ अखेर मुदत संपलेल्या ‘क’ वर्गातील १९१ संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी सहकार प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली असून या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर आॅक्टोबर २०१४ पर्यंत मुदत संपलेल्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
संवेदनशील तालुक्यातील संस्था बिनविरोध
राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील ‘ड’ वर्गातील सर्वच संस्था बिनविरोध झाल्या आहेत. करवीरमध्ये ६४ पैकी केवळ तीन संस्थांची निवडणुका होत आहेत.


‘ड’ वर्गातील संस्था निवडणूक कार्यक्रम
तालुकापात्रबिनविरोधनिवडणूक ‘क’ वर्गात
झालेल्या समावेश
कोल्हापूर शहर४१३१३१
हातकणंगले९०८३१६
करवीर६४४९३-
कागल१६१४--
शिरोळ४६४३२१
शाहूवाडी६६--
गडहिंग्लज१०१--
गगनबावडा१५१५--
राधानगरी५२३८--
आजरा१४१४--
भुदरगड१५१४१४-
पन्हाळा१८८--
चंदगड२२--


‘ड’ वर्गातील बहुतांशी संस्थांची प्रक्रिया संपली आहे. आता ‘क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकीस सुरुवात झाली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा मानस आहे.
- सुनील शिरापूरकर
जिल्हा उपनिबंधक

Web Title: Success of Cooperative Authority: Elections to nine organizations in Kolhapur city, Karveer, Hatkanangle, Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.