जिद्द व कष्ट केल्यास यश निश्चित : अभिषेक डोंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:41+5:302021-02-05T07:01:41+5:30
सरवडे : स्पर्धेच्या युगात तरुणांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जिद्द, संयम, व ध्येय ठेवून ...

जिद्द व कष्ट केल्यास यश निश्चित : अभिषेक डोंगळे
सरवडे : स्पर्धेच्या युगात तरुणांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जिद्द, संयम, व ध्येय ठेवून कष्ट केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन अभिषेक डोंगळे यांनी केले.
कासारपुतळे (ता. राधानगरी) येथे सीताराम साठे महिला दूध संस्था व व मित्रपरिवार यांच्यावतीने केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल संतोष पांडुरंग वाळके यांचा सत्कार आयोजित केला होता. त्या प्रसंगी डोंगळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच संगीता खाडे होत्या. यावेळी तानाजी खाडे, धनाजी खाडे, फौजी ओमकार पाटील, बाबुराव बसरवाडकर, संभाजी चव्हाण, ग्रामसेवक बाबुराव तावडे, अक्षय खाडे, विशाल चव्हाण, अरुण चव्हाण, सूरज खाडे आदी उपस्थित होते. अक्षय खाडे यांनी आभार मानले.