थेट ‘एफआयआर’ दाखल करा

By Admin | Updated: September 3, 2014 00:18 IST2014-09-03T00:18:07+5:302014-09-03T00:18:07+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना: डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाईची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची

Submit 'FIR' directly | थेट ‘एफआयआर’ दाखल करा

थेट ‘एफआयआर’ दाखल करा

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमाची पायमल्ली करीत मोठ्या आवाजाची डॉल्बी लावणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत थेट एफआयआर दाखल करावेत, अशी सूचना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आज, मंगळवारी येथे जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. इचलकरंजी व कोल्हापूर शहरांत निघणाऱ्या विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांच्या सूचनेप्रमाणे इचलकरंजी नगरपालिका व कोल्हापूर महानगरपालिका यांनी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याची जबाबदारी पार पाडावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
जिल्ह्यातील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी माने यांनी आज दुपारी शासकीय विश्रामगृहावर पोलीस, महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. बैठकीला महावितरण, दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाचेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायची आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मिरवणुकीच्या दिवशी विश्रांती घ्यायची, असे प्रत्येक वेळी घडते, परंतु यंदा स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंडळांवर कारवाई करायची आहे. त्यांनी दिलेल्या एफआयआरनुसार पोलीस गुन्हे नोंदविणार आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्ते दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, रस्त्यावरील लाईटस्ची व्यवस्था थोडी जादा करावी, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांच्यासह आवश्यक ते कर्मचारी चोवीस तास सेवेत ठेवावेत, अशाही सुचना केल्या.
मिरवणूक काळात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अखंडपणे कार्यरत राहावे, त्याचबरोबर काही अनपेक्षितपणे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ठिकाणी कर्मचारी तातडीने पोहोचतील अशी व्यवस्था करावी, असे बजावले. ज्या सार्वजनिक मंडळांना तात्पुरती विजेची कनेक्शन दिली आहेत, त्यांची तपासणी करा, चोरून वीज घेतली असेल अशा मंडळांवर कारवाई करा, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
मिरवणुकीच्या काळात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार असली, तरी या काळात कोणी मद्याची विक्री करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, मद्याची वाहतूक होत असेल तर ती रोखावी, अशा सूचना दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी माने, मनपा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, शहर पोलीस अधीक्षक भरतकुमार राणे, मनपा नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह प्रांत प्रशांत पाटील, मोनिकासिंग ठाकू र, अश्विनी जिरंगे, विवेक आगवणे, आदी उपस्थित होते. (प्

Web Title: Submit 'FIR' directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.