शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

‘शाहूं’च्या वारसांना संधी दिल्याने पोटशूळ : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:50 AM

कोल्हापूर / कागल : राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ५० वर्षे ज्यांनी मते मागितली, राज्यकारभार केला, त्या कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसने शाहू घराण्याचा विषय आला की ते वरचढ होऊ नये म्हणून त्यांना सातत्याने दाबून ठेवण्याचे काम केले

ठळक मुद्दे ‘शाहू ग्रुप’चे कौतुक; चंद्रकांतदादांचा शिवसेनेवर पलटवार ही कारखानदारी योग्य प्रकारे चालली पाहिजे, शेतकºयांना चांगला भाव मिळाला पाहिजेशिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला, त्यास अनुरूप मी काम करीत आहे. त्यांच्याकडील एक टक्का ऊर्जा जरी आम्हाला मिळाली तरी महाराष्टÑ बदलून टाकू.

कोल्हापूर / कागल : राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ५० वर्षे ज्यांनी मते मागितली, राज्यकारभार केला, त्या कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसने शाहू घराण्याचा विषय आला की ते वरचढ होऊ नये म्हणून त्यांना सातत्याने दाबून ठेवण्याचे काम केले. आता आम्ही ‘शाहूं’च्या वारसांना संधी दिली म्हणून त्यांचा पोटशूळ उठला असून, ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत; पण त्याला आम्ही नव्हे तर जनताच उत्तर देईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

कागल येथे शनिवारी झालेल्या कागल बॅँकेच्या ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅप. बॅँक लि.’ या नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. समरजितसिंह हे राजे विक्रमसिंह यांचा उचित वारसा चालवित असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या भागात साखर कारखानदारीने परिवर्तन झाले. ही कारखानदारी योग्य प्रकारे चालली पाहिजे, शेतकºयांना चांगला भाव मिळाला पाहिजे, यासाठी सरकार आग्रही आहे. मध्यंतरी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नव्हते, त्यांना सॉफ्ट लोन दिले. कारखान्यांच्या उत्पन्नातील ७० टक्के वाटा शेतकºयांना देण्याची अंमलबजावणी करणारे महाराष्टÑ हे देशातील एकमेव राज्य आहे. चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देशमुख यांनी सहकारात घुसलेल्या अप्प्रवृत्ती बाहेर काढून महाराष्टÑाला स्थैर्य दिले.

कोणत्याही राज्यात आर्थिक सुबत्ता यायची असेल तर संस्थात्मक कर्जाची व्यवस्था महत्त्वाची असते. खºया अर्थाने शाहू महाराजांनी सहकाराचा पाया रचला. त्याच सहकाराने मोठे रूप धारण केले असून, राज्याच्या आर्थिक विकासाबरोबरच शेतकºयांच्या जीवनातील परिवर्तनात सहकाराचा मोठा वाटा आहे. जो देश महिलाशक्तीचा वापर करतो, तोच समृद्धीकडे जातो. त्यासाठी नवोदिता घाटगे यांनी कौशल्यविकासाच्या माध्यमातून महिलांचे चांगले संघटन बांधले आहे. राज्याचे सरकार सामान्यांचे सरकार आहे. मी राजा नव्हे, तर छत्रपतींचा सेवक म्हणून काम करीत आहे. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला, त्यास अनुरूप मी काम करीत आहे. त्यांच्याकडील एक टक्का ऊर्जा जरी आम्हाला मिळाली तरी महाराष्टÑ बदलून टाकू. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालली आहे. यामध्ये आपल्यासारख्या लोकांचा आशीर्वाद महत्त्वाचा असून गेली ५० वर्षे बोलघेवड्यांमुळे महाराष्टÑाची ही अवस्था झाली असून, त्याच्या परिवर्तनासाठी शक्ती द्या, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, तीन वर्षांत सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केल्यानेच जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळत गेले; पण याला काही मंडळी सूज म्हणतात. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आम्ही परिश्रम घेतल्यानेच १२७ सरपंच व ८६३ सदस्य निवडून आणू शकलो. तुमचे चार सरपंच आहेत. तुम्ही सत्तेत आहात तर आमच्यासारखी तुम्हाला का सूज येत नाही? सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संभाजीराजे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात मेळाव्याचे संयोजक, ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष व ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गु्रपच्या वतीने राबविण्यात येणाºया कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात विरोधकांवर हल्लाबोल केला. याप्रसंगी प्रवीणसिंहराजे घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, महेश जाधव, हिंदुराव शेळके, आदी उपस्थित होते. राजे विक्रमसिंह घाटगे बॅँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी आभार मानले.‘शाहू ग्रुप’चे कौतुकराजे विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखाना, बॅँकेसह सर्वच संस्था आदर्शवत चालविल्या असून गेल्या तीन वर्षांत ‘शाहू’ कारखान्याला चार वेळा पुरस्कार मिळाला. हे उत्तम व्यवस्थापनाचे द्योतक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.चिकोत्रा, आंबेओहोळ प्रकल्प मार्गी लावूसमरजितसिंह घाटगे यांनी चिकोत्रा व आंबेओहोळ प्रकल्पांबाबत अतिशय पोटतिडकीने व्यथा मांडली. तिची दखल घेऊन कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.संभाजीराजे लाभार्थी नव्हेत...संभाजीराजे व समरजितसिंहराजे यांच्यावर ते आमचे लाभार्थी असल्याची टीका होते; पण टीकाकारांना स्पष्ट शब्दांत सांगतो, शाहू महाराजांचा वारसा देशाच्या सर्वोच्च सभागृहात असला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या माध्यमातून संदेश पाठवून संभाजीराजेंना बोलावून घेऊन राष्टÑपती कोट्यातून पद दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.हे तर शाहूंच्या घराण्यावरील प्रेम!सभेसाठी जमलेल्या विराट जनसमुदायाने मुख्यमंत्री भारावून गेले. जिथेपर्यंत माझी नजर जाते तिथेपर्यंत लोक दिसत असून, यावरून विक्रमसिंह घाटगे व शाहू घराण्याच्या कर्तृृृत्वावर लोकांचे प्रेम दिसते, असे फडणवीस यांनी सांगितले.सहकारमंत्र्यांचा  हसन मुश्रीफांना टोलासहकारातील चुकीच्या कारभारामुळे १३ जिल्हा बॅँका डबघाईला आल्या आहेत. आम्ही कधी सुडाचे राजकारण केले नाही; पण काहीजण आपल्या शेतकºयांना कर्जापासून वंचित ठेवून कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांना कर्जपुरवठा करीत असल्याचा टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना हाणला.

टॅग्स :Politicsराजकारणministerमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस