शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषनगरातील तरुणाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:48 IST

गेले सात दिवस बेपत्ता असलेल्या सुभाषनगरातील तरुणाचा व्हीनस कॉर्नर येथील जयंती नदीच्या पात्रात मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. श्रीकांत राम साळे (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. ८ आॅगस्टला शाहूपुरीतून कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

ठळक मुद्देकामावरून घरी जात असताना गेला वाहून व्हीनस कॉर्नर जयंती नदीपात्रात मिळाला मृतदेह

कोल्हापूर : गेले सात दिवस बेपत्ता असलेल्या सुभाषनगरातील तरुणाचा व्हीनस कॉर्नर येथील जयंती नदीच्या पात्रात मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. श्रीकांत राम साळे (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. ८ आॅगस्टला शाहूपुरीतून कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचे नातेवाइकांनी सांगितले.श्रीकांत साळे हे शाहूपुरी येथील कुशनच्या दुकानात कामाला होते. नेहमीप्रमाणे ८ आॅगस्टला सकाळी ते कामावर गेले. रात्री नऊच्या सुमारास ते घरी येतात, त्या दिवशी ते आलेच नाहीत; त्यामुळे घरच्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची वर्दी दिली.

बुधवारी सकाळी व्हीनस कॉर्नर येथील जयंती नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह मिळून आला. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्याच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. नातेवाइकांना फोन करून बोलवून घेतले असता, त्यांनी श्रीकांत साळे यांचा मृतदेह असल्याचे सांगितले.

रात्रीच्या वेळी कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर