कोल्हापूरात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:31+5:302021-01-25T04:23:31+5:30
काेल्हापूर : कोल्हापूर शहरात आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली. आझाद ...

कोल्हापूरात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
काेल्हापूर : कोल्हापूर शहरात आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली. आझाद हिंद तरूण मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रताप देसाई, श्रीकांत पाटील, सुरेश निकम, मोहन जाधव, सुधाम सरनाईक, अभिजीत सूर्यवंशी, मानसिंग पोवार, शुभम तोडकर, प्रथमेश मोरे आदी उपस्थित होते.
नाईक महाविद्यालय
कोल्हापूर : येथील वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एज्युकेशन आणि स्पोर्टस ॲकडमीचे संस्थापक अध्यक्ष महादेव वांद्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, प्रा. धनंजय चाफोडीकर, डॉ. मनिषा पाटील, डॉ. आण्णासाहेब पाटील, शुभांगी पाटील, गुरूदास जिरगे, वर्षा पाटील आदी उपस्थित होेते. प्रा. डॉ. उर्मिला पाटील यांनी आभार मानले.
न्यू प्राथमिक विद्यालय
कोल्हापूर : न्यू प्राथमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित हाेते.