विद्यार्थ्यांनी साधला मोदींशी संवाद

By Admin | Updated: September 5, 2014 23:59 IST2014-09-05T23:46:37+5:302014-09-05T23:59:58+5:30

चार लाख विद्यार्थ्यांचा सहभाग : ९१३ शाळांमध्ये टी.व्ही., रेडिओची सोय

Students took conversations with Modi | विद्यार्थ्यांनी साधला मोदींशी संवाद

विद्यार्थ्यांनी साधला मोदींशी संवाद

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी शिक्षक दिनानिमित्त देशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांशी टी.व्ही., रेडिओद्वारे प्रथमच संवाद साधला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९१३ शाळांमधील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरामुळे विद्यार्थी भारावले.
यावर्षी प्रथमच शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण देशातील सर्व शाळांमध्ये रेडिओद्वारे ऐकविले व दूरचित्रवाणीमार्फत दाखविले गेले. त्यासाठी शिक्षण खात्यानेही सर्वत्र आदेश देऊन तयारीही जोरदार केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ९१३ शाळांमधील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी भाषण टी.व्ही.वर पाहिले. ज्या ठिकाणी ही सोय होणार नाही तेथे सॅटकॉम, वेबकॉस्ट, आदींद्वारे भाषण दाखविले व ऐकविले गेले. ज्या शाळेत कोणतीही सोय होणार नाही. त्या शाळांमधील मुख्याध्यापकांना मुलांना जेथे टी.व्ही., रेडिओची सोय केली होती, त्या ठिकाणी नेण्याची मुभाही शिक्षण खात्याने दिली होती.

महापालिकेच्या
६५ शाळांतही केली सोय
महापालिका अंतर्गत ६५ शाळांमधील ९ हजार ५०० इतके विद्यार्थी पंतप्रधानांचे भाषण टी.व्ही.वर आणि इंटरनेटच्या माध्यमातून दाखविले, तर काही शाळांमध्ये रेडिओद्वारे ऐकवले.
हा अहवाल समन्वयकांकडून
घेण्यात येईल.
- बी. एम. किल्लेदार
प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर महापालिका

अहवाल दोन दिवसांत
किती शाळांनी हे भाषण ऐकवले, दाखविले याची माहिती प्रत्येक दहा शाळांपाठीमागे केंद्रप्रमुख हे घेणार आहेत; तर केंद्रप्रमुख गटशिक्षण अधिकाऱ्यांना हा अहवाल देणार आहेत. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना व तेथून शिक्षण उपसंचालक आणि संचालक या पातळीवरून शेवटी राज्याच्या शिक्षण खात्याकडे व तेथून केंद्रीय शिक्षण खात्याकडे दोन दिवसांत पाठविला जाणार आहे.
- एम. के. गोंधळी
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर)

कमी वेळात विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या शंभर दिवसांतच विद्यार्थ्यांशी संवाद साधून एकप्रकारे शिक्षण हा देशाचा मूलभूत पाया असल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब नव्या पिढीसाठी शुभ आहे.
- संयोगीता पाटील
वसंतराव देशमुख हायस्कूल, कोल्हापूर

पंतप्रधानांच्या
भाषणाने भारावलो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोप्या हिंदी भाषणामुळे त्यांचे विचार सहजरीत्या आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांची तळमळ आणि कृती आमच्यासाठी यापुढे लाभदायक ठरणार
- हरीश जाधव,
वसंतराव देशमुख हायस्कूल, कोल्हापूर

Web Title: Students took conversations with Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.