विद्यार्थ्यांनी अनुभवला क्वॉड कॉप्टरचा थरार
By Admin | Updated: January 13, 2015 00:21 IST2015-01-12T23:52:36+5:302015-01-13T00:21:17+5:30
‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे आयोजन : आता उत्सुकता ‘सफर विमानाची’

विद्यार्थ्यांनी अनुभवला क्वॉड कॉप्टरचा थरार
कोल्हापूर : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे क्वॉड कॉप्टरची प्रात्यक्षिके शहरातील महावीर इंग्लिश मीडियम स्कूल (कळंबा), अल्फोन्सा स्कूल (पाडळी बु्रदुक), न्यू हायस्कूल, विमला गोयंका स्कूल, चाटे स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, मीडियम स्कूल व प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज दाखविण्यात आली़ अशा अनेक क्वॉडकॉप्टरच्या गगनभरारीचा आनंद लोकमत बाल विकासमंच आयोजित १८ ते २० जानेवारी या कालावधीत कमला कॉलेज परिसरात डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवन येथे भरणाऱ्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनास अनुभवण्यास मिळणार आहे़ या कार्यक्रमाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते पीबीसीस अॅरो हब आहेत़
प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे़ विमान
क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे़ प्रदर्शनादरम्यान दररोज सकाळी अकरा, दुपारी एक आणि चार व सायंकाळी सहा वाजता क्वॉडकॉप्टरची भरारी पाहता येणार आहे़ बाल विकास मंच, सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्य व त्यांच्या पालकांसाठी २० रुपये, तर इतरांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे़ प्रदर्शनाच्या प्रवेशिका लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट कोंडा ओळ, कोल्हापूर येथे सकाळी दहा सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत़ अधिक माहितीसाठी ७७९८३४४७४४ वर संपर्क साधावा़
प्रदर्शनात काय पाहाल
विविध देशांतील विमानांच्या प्रतिकृती
विमानांचा इतिहास आणि क्वॉड कॉप्टरची भरारी