विद्यार्थ्यांनी साकारले इको-फ्रेंडली बापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:24+5:302021-09-13T04:23:24+5:30

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम वाढीस लागावे व प्रदूषणावर जागृती व्हावी यासाठी शाळास्तरावर गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात प्रदूषण मंडळाने स्काऊट ...

The students realized an eco-friendly father | विद्यार्थ्यांनी साकारले इको-फ्रेंडली बापा

विद्यार्थ्यांनी साकारले इको-फ्रेंडली बापा

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम वाढीस लागावे व प्रदूषणावर जागृती व्हावी यासाठी शाळास्तरावर गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात प्रदूषण मंडळाने स्काऊट विभागाला सूचना केल्या होत्या. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी स्काऊट विभागाकडे सोपवली होती. निपाणी तालुक्यातील १४ शाळांची निवड करून या शाळांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. सध्या कोरोनामुळे सहावी ते दहावीपर्यंत शाळा सुरू आहेत. या वर्गांमध्ये दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना हळद, माती, शाडू अथवा गव्हाचे पीठ यापासून मूर्ती बनवण्याचे सांगण्यात आले होते. यानुसार विद्यार्थ्यांनी विविध मूर्तीं बनवून स्पर्धेत सहभाग घेतला. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना व व्यंकटेश्वरा साखर कारखान्याने या स्पर्धेसाठी सहकार्य केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

Web Title: The students realized an eco-friendly father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.