शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'ऑनलाईन'ने पोरं पुन्हा झाली ‘घरकोंबडी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 11:45 IST

ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांतून होत आहे.

कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दीड वर्षानंतर शिक्षण पूर्वपदावर येत होते. मात्र, पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने मुक्त वातावरणात रमलेली पोरं ‘घरकोंबडी’ झाली आहेत. ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांतून होत आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राची घडी विस्कटली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. ऑनलाईन विश्वातून बाहेर पडून मुले-मुली या मुक्त वातावरणामध्ये रमली. त्यातच आता पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.

शाळा पुन्हा सुरू कराऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळा पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू कराव्यात, या मागणीसाठी राज्यभर मोहीम सुरू झाली आहे. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास शासनाने त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी गुरुवारी केली.

गुरुजींची शाळा सुरूचऑफलाईन वर्ग बंद असले, तरी शिक्षकांनी दैनंदिन आणि प्रशासकीय कामकाज, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थी नसले, तरी शिक्षकांना शाळा, महाविद्यालयात जावे लागत आहे.

ऑनलाईनचा कंटाळा आला!आता कुठे आम्हाला शाळेची गोडी लागली होती. त्यातच पुन्हा शाळा बंद झाल्याने खूप वाईट वाटत आहे. शाळा सुरू कराव्यात.- शर्वरी कोळी, गंगावेशमोबाईलवरील ऑनलाईन शिक्षण समजत नाही. त्यात लक्ष लागत नाही. शाळा परत सुरू व्हाव्यात. - स्वरा कांबळे, सोनाळी, पालक काय म्हणतात?मला दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. मुली इयत्ता चौथीला, तर मुलगा इयत्ता पहिलीमध्ये आहे. ऑनलाईन शिक्षण त्यांना समजत नाही. शाळा बंद असल्याने सर्व मुलांची अवस्था एक प्रकारे घरकोंबड्यांसारखी झाली आहे. शासनाने शाळा लवकर सुरू कराव्यात. - सागर शेलार

माझा मुलगा इयत्ता पहिलीमध्ये आहे. शिक्षणाची त्याची सुरुवात आहे. त्याला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण काय समजणार, हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शाळा पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. - प्रवीण वारके

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइनEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या