विद्यार्थ्यांनी बनविले इको फ्रेंडली बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:00+5:302021-09-09T04:30:00+5:30
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम वाढीस लागावे व प्रदूषणावर जागृती व्हावी यासाठी शाळा स्तरावर गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात प्रदूषण मंडळाने ...

विद्यार्थ्यांनी बनविले इको फ्रेंडली बाप्पा
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम वाढीस लागावे व प्रदूषणावर जागृती व्हावी यासाठी शाळा स्तरावर गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात प्रदूषण मंडळाने स्काऊट विभागाला सूचना केल्या होत्या.
पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी स्काऊट विभागाकडे सोपविली होती. निपाणी तालुक्यातील 14 शाळांची निवड करून या शाळेमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. सध्या कोरोनामुळे सहावी ते दहावीपर्यंत शाळा सुरू आहेत. या वर्गामध्ये दोन गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी हळद, माती, शाडू अथवा गव्हाचे पीठ यापासून मूर्ती बनविण्याचे सांगण्यात आले होते. यानुसार विद्यार्थ्यांनी विविध मूर्ती बनवून स्पर्धेत सहभाग घेतला. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना व व्यंकटेश्वरा साखर कारखान्याने या स्पर्धेसाठी सहकार्य केले. या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.
*या शाळांमध्ये झाली स्पर्धा*
मराठी मुलांची शाळा, नांगणूर
मराठी मुलांची शाळा, श्रीपेवाडी
श्री जी एम संकपाळ हायस्कूल, श्रीपेवाडी
सीएमसी निपाणी
सरकारी हायस्कूल, निपाणी
मुन्सीपल हायस्कूल, निपाणी
सरकारी हायस्कूल, कुन्नूर
व्हीएमएस हायस्कूल, निपाणी
केएलई सीबीएससी, निपाणी
विद्या मंदिर, निपाणी
केएचपीएस सरकारी, हुन्नरगी
मॉडर्न स्कूल, निपाणी
जोल्ले सीबीएससी, नांगणूर
केएचपीएस, लखनापूर
फोटो
श्रीपेवाडी : येथील संकपाळ हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी गव्हाच्या पिठापासून गणेशमूर्ती बनविल्या.