विद्यार्थ्यांनी साधला पोलिसांशी संवाद
By Admin | Updated: December 11, 2014 23:43 IST2014-12-11T23:04:30+5:302014-12-11T23:43:48+5:30
सायबर महाविद्यालय : जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य

विद्यार्थ्यांनी साधला पोलिसांशी संवाद
कोल्हापूर : जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून सायबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काल, बुधवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेट देऊन मानवी हक्कांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा व प्रबोधन केले. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
पोलीस यंत्रणा ही समाजाची अविभाज्य घटक असून, मानवी हक्कांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊन सायबर कॉलेजचे
डॉ. दीपक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे मानवी हक्क दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शहरातील पोलीस मुख्यालय, उपअधीक्षक कार्यालय, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा व करवीर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या.
पोलीस ठाण्यातील विविध विभाग, त्यांच्या कामाची पद्धत यासह मानवी हक्कांच्या विविध मुद्द्यांची माहिती घेतली. रोज वादावादी आणि हाणामारीच्या घटनांची नोंद पोलीस डायरीमध्ये करणाऱ्या पोलिसांना आज या दिनानिमित्त एक वेगळा आनंद मिळाला.
संचालक डॉ. एम. एम.
अली, डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांचे सहकार्य
लाभले. यावेळी विशाल पोळ, प्राजक्ता मुधळे, कृतिका यादव, तौसिफ महाबरी, सारिका तळेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)