विद्यार्थिनींनो, सैन्यदलाबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:33+5:302021-03-09T04:26:33+5:30
वारणानगर : राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून देश उभारणीचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असून, महाविद्यालयातील तरुण विद्यार्थिनींनी स्वयंशिस्त पाळून भारतीय सैन्यदलाबरोबरच ...

विद्यार्थिनींनो, सैन्यदलाबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवा
वारणानगर : राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून देश उभारणीचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असून, महाविद्यालयातील तरुण विद्यार्थिनींनी स्वयंशिस्त पाळून भारतीय सैन्यदलाबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी प्राप्त कराव्यात, असे आवाहन कोल्हापूर येथील ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या प्रशासकीय अधिकारी मेजर गुगामालती ए. यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.
वारणा समूहाचे नेते अध्यक्ष डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी वासंती रासम यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. चिकुर्डेकर यांनी भारतीय घटनेने महिलांना समानतेचा अधिकार दिला असून, राष्ट्रउभारणीच्या कार्यात महिलांनी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. यावेळी एनसीसी अधिकारी सुजाता पाटील, सेवानिवृत्त एनसीसी अधिकारी निशा भोसले, डॉ. एस. एस. खोत, डॉ. एस. बी. शहापुरे उपस्थित होते.
फोटो : ०८ वारणानगर महिला दिन
ओळी - यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयांत जागतिक महिला दिन कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेच्या कोल्हापूर विभागीय प्रशासकीय अधिकारी गुगामालती ए. यांचा सत्कार प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केला. यावेळी डॉ. एस. बी. शहापुरे, निशा भोसले आदी.