विद्यार्थ्याने ओळखणे शिक्षकांना अभिमानाच

By Admin | Updated: December 15, 2014 23:59 IST2014-12-15T23:37:36+5:302014-12-15T23:59:21+5:30

इंद्रजित देशमुख : बी. एस. ओडियार यांचा सत्कारे

The students are proud to know the teacher | विद्यार्थ्याने ओळखणे शिक्षकांना अभिमानाच

विद्यार्थ्याने ओळखणे शिक्षकांना अभिमानाच

गारगोटी : उतारवयात पायाला हात लावून सर, मी तुमचा विद्यार्थी आहे, असे ऐकणे हे शिक्षकांसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असते. हे ज्येष्ठांच्या जीवनातील सार तरुणांपुढे यावे. त्यामुळे चांगल्या संस्काराचा वारसा पुढे नेण्यास
चालना मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या विकास
विभागाचे उपायुक्त इंद्रजित देशमुख यांनी केले.
गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. बी. एस. ओडियार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीतर्फे आयोजित केलेल्या समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते. इंद्रजित देशमुख व सतेज पाटील यांच्या हस्ते प्रा. बी. एस. ओडियार यांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ. सुशीला ओडियार यांचा सत्कार सरपंच छाया सारंग यांच्या हस्ते झाला.
सतेज पाटील म्हणाले, मौनी विद्यापीठाने आजपर्यंत अनेक रत्ने पारखली आणि त्यांना मोठे केले. अशा अनेक रत्नांनी प्रतिकूल परिस्थितीत काम करीत श्क्षिण क्षेत्रात चांगले योगदान दिले. डॉ. जयंत कळके यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.
यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, बी. एस. देसाई, के. जी. नांदेकर, लेमनराव निकम, दत्तात्रय मोरे, नारायण देसाई, मधुकर देसाई, खंडेराव घाटगे, डॉ. राजन गवस, शमराव देसाई, प्रा. बाळ देसाई, एच. बी. देसाई, बी. ए. सदलगे, सर्जेराव मोरे, वसंतराव देसाई, एस. एम. खेगडे, डॉ. एस. बी. शिंदे, एम. एम. मोरस्कर, राम भाट, प्रभाकर ठाकूर, विद्यार्थी, आदी उपस्थित होते. के. ए. देसाई यांनी आभार मानले. आनंद हळंबे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The students are proud to know the teacher