शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जगद्विख्यात फ्रीस्टाईल फुटबॉलर जेमी नाईटच्या करामतींनी विद्यार्थी अचंबित

By सचिन भोसले | Updated: November 3, 2023 16:26 IST

मानेवर चेंडू व अंगा खांद्यावर चेंडू काही मिनिटे रेंगाळत ठेवण्याचे दोन गिनीज बुक ऑफ रेकाॅर्ड

कोल्हापूर : फुटबाॅलवर प्रचंड नियंत्रण आणि त्यावरील करामतीत जगदविख्यात विश्वविक्रमवीर सर्वाधिक मागणी असलेला व्यावसायिक फुटबाॅल फ्रीस्टाईलर जेमी नाईट ने कोल्हापूरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलला शुक्रवारी भेट दिली. या भेटीत त्याने नेक फ्लिक्ट, डोक्यावर स्पीन, ब्लाॅईंड हिल अशा फुटबाॅलवर नियंत्रण ठेवणाऱ्या करामती सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना अचंबित केले.जेमी हा सर्वाधिक मागणी असलेला सर्वोत्तम व्यावसायिक फुटबाॅल फ्रीस्टाईलर्स पैकी एक आहे. त्याने जागतिक ब्रॅंडसह काम करीत जगभरात प्रवास केला आहे. जेमीने ८० हजार लोकांसमोर २०१७ मध्ये युईएफए चॅम्पियन्स लिग अंतिम खेळपट्टीवरील करामती सादर केल्या आहेत. रोनाॅल्डीनोचा चाहता असलेला या फुटबाॅलरच्या नावावर ब्लाॅईंट हिल आणि नेक फिट म्हणजे मानेवर चेंडू व अंगा खांद्यावर चेंडू काही मिनिटे रेंगाळत ठेवण्याचे दोन गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डस नावावर आहेत. पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या देशभरातील १४१ शाळांमध्ये जेमीचे खास प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी जेमीने ८.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत२६० विद्यार्थी-विद्यार्थीनींना खास फुटबाॅलवर नियंत्रण कसे ठेवायचे याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. त्याच्या करामती पाहून उपस्थित विद्यार्थी अचंबित झाले. वाहवा आणि टाळ्यांच्या वर्षाव त्याच्या सादरीकरणावर झाला. यावेळी शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर. उपप्राचार्य मनिषा अमराळे, ज्योती गाला, अभिजीत परब आदी मान्यवर उपस्थित होते.

जेमीच्या सादरीकरणाने विद्यार्थी अचंबितजेमीने फुटबाॅल डोक्यावर स्पीन करून दाखविला. त्यासोबतच हातावर, खांद्यावर, आर्म, गुडघ्यावर जगलिंग, सींग बोन अर्थात पिंडरीवर, थाॅईज अशा सर्वांगावर फुटबाॅल न पाडता काहीकाळ फिरवून (स्पीन) करून दाखविला. त्याच्या या करामती पाहून विद्यार्थ्यांसह उपस्थित अचंबित झाले.

सरावातील सातत्यामुळे जगातील कुठलीही गोष्ट साध्य करता येते. त्यामुळेच मी दोन गिनीज रेकाॅर्ड करू शकलो. मी तर वयाच्या दहाव्या वर्षांपासून फुटबाॅलवर नियंत्रण मिळवण्याचा सराव करीत आहे. प्रत्येकाचे एक पॅशन असते, त्यात रममाण झाला की ती गोष्ट साध्य करता येते. - जेमी नाईट, फ्रीस्टाईल फुटबाॅलर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल