एसटीची टेम्पोला धडक, टेम्पोचालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:21 IST2021-03-07T04:21:50+5:302021-03-07T04:21:50+5:30

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे (ता. करवीर ) येथे एसटी बसने टेम्पोला जोरात धडक दिली. या अपघातात टेम्पोचालक ...

ST's tempola hit, tempo driver injured | एसटीची टेम्पोला धडक, टेम्पोचालक जखमी

एसटीची टेम्पोला धडक, टेम्पोचालक जखमी

कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे (ता. करवीर ) येथे एसटी बसने टेम्पोला जोरात धडक दिली. या अपघातात टेम्पोचालक जखमी झाला. रोहन कामीरकर (रा. बाजार भोगाव ) असे जखमीचे नाव आहे. यावेळी एसटी चालकाने पलायन केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, रंकाळा स्टँड येथून कोदेकडे निघालेल्या एसटी बसची ( एम. एच. ०६, एस. ८३८० ) बाजार भोगाव येथून कोल्हापूरकडे निघालेल्या मालवाहतूक टेम्पोशी (एम. एच.१४, एफ. ८८०० ) दोनवडे येथे वळणावर धडक झाली. एका कारला एसटी ओव्हरटेक करत असताना ही धडक झाली. यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आणि टेम्पोचा चक्काचूर झाला. एसटीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर एसटी चालक पळून गेला. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

(फोटो) दोनवडे ता. करवीर येथे मालवाहू टेम्पो व एसटीची भीषण धडक झाली.

Web Title: ST's tempola hit, tempo driver injured