विरोधकांची संघर्ष यात्रा पोहोचली कोल्हापुरात

By Admin | Updated: April 25, 2017 13:12 IST2017-04-25T12:38:50+5:302017-04-25T13:12:28+5:30

 ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 25  - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचा सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राज्यातील ...

The struggle of opponents reached the journey in Kolhapur | विरोधकांची संघर्ष यात्रा पोहोचली कोल्हापुरात

विरोधकांची संघर्ष यात्रा पोहोचली कोल्हापुरात

 ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 25  - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचा सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह इतर पक्षांनी काढलेली संघर्ष  यात्रा मंगळवारी सकाळी नऊ वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास जन्मस्थळाला भेट देऊन मान्यवरांनी अभिवादन केले.
 
यानंतर कुलस्वामिनी अंबाबाईला कर्जमाफीचे साकडे घालण्यासाठी संघर्ष यात्रा पुढे रवाना झाली आहे. यावेळी "फडणवीस सरकार होश में आव.... मोदी सरकार होश में आव... तुरडाळीची खरेदी झाली पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा",अशा घोषणांनी विरोधकांनी परिसर दणाणून सोडला होता.
 
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार धनंजय महाडिक आमदार विद्या चव्हाण, आमदार हसन मुश्रीफ,  आमदार सतेज पाटील, महापौर हसीना फरास आमदार संद्यादेवी कुपेकर आधी उपस्थित होते.

https://www.dailymotion.com/video/x844w47

Web Title: The struggle of opponents reached the journey in Kolhapur