संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:07+5:302021-09-25T04:25:07+5:30

मंत्री हसन मुश्रीफ : कागलमध्ये आगमन कागल : जोपर्यंत तुम्ही आणि ईश्वर माझ्या पाठीशी आहात, तोपर्यंत मला कोणाला घाबरण्याची ...

The struggle has reached its fifth | संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलेला

संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलेला

मंत्री हसन मुश्रीफ : कागलमध्ये आगमन

कागल : जोपर्यंत तुम्ही आणि ईश्वर माझ्या पाठीशी आहात, तोपर्यंत मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. किरीट सोमय्या यांना कागल तालुक्यात येऊ द्या, त्यांना विरोध करू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. संघर्ष तुम्हाला मला नवा नाही. तो आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. धैर्याने मुकाबला करूया अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

१५ दिवसांनंतर ते गुरुवारी रात्री उशिरा कागलमध्ये आले. त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील लोक पहाटेपासून त्यांच्या निवासस्थानी झुंडीने येत होते. ग्रामीण महिलांची तसेच तरुणांची संख्या लक्षणीय होती. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारीही येत होते. मंत्री मुश्रीफ यांनी चार वेळा माइकवरून उपस्थितांशी संवाद साधून संताप व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. हे केवळ माझ्या विरोधात नव्हे तर महाविकास आघाडी सरकार विरुद्धचे षडयंत्र आहे. त्यास आपण बळी पडता कामा नये. सोमय्यांकडे दुर्लक्ष करा ते येणार त्या दिवशी टीव्ही बघू नका. शेतात जाऊन काम करा. सोमय्यांना आपल्या कागल तालुक्याचा विकासही पाहू द्या, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांची समजूत काढली.

विमानतळावरही स्वागत..

गुरुवारी रात्री मंत्री मुश्रीफांच्या स्वागतासाठी काही उत्साही कार्यकर्ते बेळगाव विमानतळावर गेले होते. निपाणी, कोगनोळी नाका, लिंगणूर फाटा तसेच गैबी चौकातही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. निवासस्थानाबाहेर उशिरापर्यंत गर्दी आणि घोषणाबाजी सुरू होती.

फोटो २४ कागल मुश्रीफ

कागल येथे मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील लोकांनी गर्दी केली होती.

Web Title: The struggle has reached its fifth