शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

थोरल्या दवाखान्यावरील विश्वास होतोय दृढ !

By admin | Updated: April 12, 2017 16:01 IST

वर्षभरात तब्बल ८२०० पेक्षा जास्त प्रसुती

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : कोल्हापूर : ‘जिल्ह्याची आरोग्यवाहिनी’ समजल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) प्रसूती विभागात या आर्थिक वर्षात तब्बल ८२०० प्रसूती झाल्या. त्यामध्ये स्वाभाविक (नॉर्मल) ५४४० तर सिझेरियन प्रसूती २७५७ झाल्या. या आकडेवारीमुळे सीपीआरमध्ये बाळ-बाळंतिणीवर चांगल्या प्रकारचे उपचार होतात, हे स्पष्ट होत आहे.सीपीआरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या शेजारच्या जिल्ह्यातून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. सीपीआरमधील प्रमुख विभागांपैकी एक म्हणजे प्रसूती विभाग होय. एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत सुमारे ८२०० प्रसूती झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नॉर्मल डिलिव्हरीचा समावेश आहे. सीपीआर रुग्णालय ‘गरिबांचे रुग्णालय’ म्हणून ओळखले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे सीपीआरने आता कात टाकली आहे. येथे आता अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. प्रसूती विभागात गरिबांसह श्रीमंत वर्गातील महिलाही प्रसूत होत आहेत. विशेष म्हणजे हा विभाग २४ तास कार्यरत असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या महिलांवर तत्काळ उपचार होतात. येथे सेवेबरोबर स्वच्छताही चांगली आहे.प्रसूती विभाग आणखी सुसज्ज करण्याची गरज...प्रसूती विभागात सध्या शंभर बेड आहेत. शहराच्या मानाने बेडची संख्या कमी आहे. त्यातच शहरातील इतर भागांतून आणि विशेषत : ग्रामीण भागातून याठिकाणी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे.साधारणत: या विभागाला सध्या १३० ते १५० बेड (कॉट) गरज आहे. त्यामुळे प्रसूती विभागात बेडची संख्या वाढवावी, अशी मागणी नातेवाईकांमधून होत आहे.सामाजिक संस्थांचा मदतीचा हात...प्रसूती विभागातील सोयी-सुविधांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या विभागात कोणतीच कमतरता बाळ-बाळंतिणीला भासत नाही. दोन आठवड्यांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेने या ठिकाणी दोन अ‍ॅक्वागार्ड (पाणी शुद्धिकरण यंत्रणा) नव्याने बसविली आहेत.आॅपरेशन थिएटर : १६ परिचारिकागायनकॅलॉजी विभाग : १० सिझर विभाग : १६ सहाय्यक प्राध्यापक : ३लेक्चरर : ७ वैद्यकीय अधिकारी : ४वरिष्ठ निवासी डॉक्टर : ४ कनिष्ठ निवासी डॉक्टर : ८