विजयात हातकणंगले तालुक्याची भक्कम साथ : आमदार लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:32 IST2020-12-30T04:32:17+5:302020-12-30T04:32:17+5:30
वाठार येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कार्यस्थळावर अरुण लाड यांचा विजयाबद्दल आमदार राजू आवळे यांनी सत्कार केला. यावेळी ...

विजयात हातकणंगले तालुक्याची भक्कम साथ : आमदार लाड
वाठार येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कार्यस्थळावर अरुण लाड यांचा विजयाबद्दल आमदार राजू आवळे यांनी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते तसेच विजयासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार आवळे यांचे आमदार लाड यांनी आभार मानले.
आमदार आवळे म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेत निवडणुकीत प्रचारायंत्रणा राबविली. भाजपची या मतदारसंघातील विजयाची परंपरा रोखली. महाविकास आघाडीच्या संघटित शक्तीपुढे भाजपचा यापुढे टिकाव लागणार नाही हे या निकालाने सिद्ध करून दाखविले आहे. यावेळी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक चेतन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रा. बी. के. चव्हाण, ॲड. शहाजी पाटील,शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समितीचे संचालक शशिकांत पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कपिल पाटील, रमेश पाटोळे, सुहास शिर्के उपस्थित होते.