गडहिंग्लजला महावितरण कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 02:07 PM2021-07-20T14:07:39+5:302021-07-20T14:10:34+5:30

Mahavitran Gadhingalaj Kolhapur : केंद्र सरकारच्या वीज उद्योग खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ येथील महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

Strong protests by MSEDCL employees at Gadhinglaj | गडहिंग्लजला महावितरण कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने

गडहिंग्लज येथे महावितरण विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सादीक देसाई, नागेश बसरीकट्टी, संदीप पाटील, श्रीपाद चिकुर्डे, दत्तात्रय गुरव, पाटील आदी सहभागी झाले होते.

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लजला महावितरण कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शनेकेंद्र सरकारचा निषेध : विद्युत कायदा मागे घेण्याची मागणी

गडहिंग्लज : केंद्र सरकारच्या वीज उद्योग खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ येथील महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन, सब आॅर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन, राज्य वीज कामगार काँगे्रस या संघटनातर्फे ही निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या द्वार सभेत केंद्राच्या खाजगीकरण धोरणाविरूद्ध जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

सब आॅर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष सागर दांगट म्हणाले, शासकीय कार्यालये खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याचा सरकारचा घाट आहे. केंद्राच्या खाजगीकरणाचे धोरण ग्राहक व कर्मचारी दोघांनाही मारक आहे, हे अन्यायी धोरण सरकारने मागे घ्यावे.

वर्कर्स फेडरेशनचे विभागीय सचिव सादीक देसाई, नागेश बसरीकट्टी, संदीप पाटील, श्रीपाद चिकुर्डे, दत्तात्रय गुरव आदी सहभागी झाले होते.


 

 

 

Web Title: Strong protests by MSEDCL employees at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.