भडगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:05+5:302021-08-20T04:29:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुरगूड : भडगाव (ता. कागल) गावातील ग्रामस्थांनी नेहमीच मुश्रीफ यांना साथ दिली आहे. त्यामुळे या गावातील ...

भडगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : भडगाव (ता. कागल) गावातील ग्रामस्थांनी नेहमीच मुश्रीफ यांना साथ दिली आहे. त्यामुळे या गावातील विविध विकासकामांसाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले.
भडगाव येथील समाजमंदिर बांधकाम तसेच अन्य विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच बी. एम. पाटील होते.
यावेळी मुश्रीफ यांनी गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने पूरग्रस्तांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, देवानंद पाटील, राजेंद्र पाटील, समाधान राणे, प्रकाश भिऊंगडे, पुंडलिक पाटील, मधुकर कांबळे, सहदेव चौगुले, अमोल भांडवले आदी उपस्थित होते.
१९ भडगाव नावेद मुश्रीफ
फोटो ओळ
भडगाव (ता. कागल) येथे समाजमंदिर बांधकामाचा शुभारंभ नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी उपसरपंच बी. एम. पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.