पट्टणकोडोलीत तरुणास पाठलाग करून मारहाण

By Admin | Updated: February 14, 2016 01:05 IST2016-02-14T01:05:09+5:302016-02-14T01:05:09+5:30

गुन्हा दाखल : परिसरात घबराटीचे वातावरण

Strike the youth in racket and hit him | पट्टणकोडोलीत तरुणास पाठलाग करून मारहाण

पट्टणकोडोलीत तरुणास पाठलाग करून मारहाण

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे एका हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहताना झालेला वाद मिटविण्यास गेलेल्या तरुणास सिनेस्टाईलने पाठलाग करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बंडू धुळा भोमाण्णा, सोमनाथ कामाण्णा, गंगाराम केरू, नामदेव मोठे, राघु लाली व इतर दहा ते बाराजणांवर हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, पट्टणकोडोली येथील एका हायस्कूलचा कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी राहुल तोडकर व त्याचा मित्र गेले होते. यावेळी राहुलचा मित्र व बंडू भोमाण्णा यांच्यात वादावादी झाली. हायस्कूलपासून सुरू झालेला वाद येथील मराठी शाळेजवळ येऊन पोहोचला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भोमाण्णा आणि मित्रांत सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी राहुल तोडकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंडू भोमाण्णा, सोमनाथ कामाण्णा, गंगाराम केरू, नामदेव मोठे, राघु लाली व इतर दहा ते बाराजणांनी राहुल तोडकर यास मारहाण करण्यास सुरुवात केली. राहुल याने त्या ठिकाणाहून पळ काढला, मात्र त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
 

Web Title: Strike the youth in racket and hit him