पन्हाळा तालुक्यातील मुद्रांक विभागातील कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:26+5:302021-09-22T04:28:26+5:30
महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाकडे गेली तीन-चार वर्षे विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देऊनही शासनाकडून त्यांच्या ...

पन्हाळा तालुक्यातील मुद्रांक विभागातील कर्मचारी संपावर
महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाकडे गेली तीन-चार वर्षे विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देऊनही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेने नोंदणी व मुद्रांक विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवार, दि.२१ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाने त्वरित दखल घ्यावी व त्यांच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, यासाठी पन्हाळा तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दि.२१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपास जाहीर पाठिंबा दिला आहे. पन्हाळा तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने आज पाठिंब्याचे पत्र येथील दुय्यम निबंधक अधिकारी वहिदा गवंडी यांना दिले असून, संप काळात मुद्रांक विक्री बंद ठेवणार असल्याचे कळविले आहे.