हळदीत कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:24 IST2021-05-13T04:24:09+5:302021-05-13T04:24:09+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व गावातील बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व कोरोनाला वेशीबाहेर ...

हळदीत कडक लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व गावातील बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यासाठी हळदी ता.करवीर येथील बाजारपेठेसह गावात गुरुवार १३ ते ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लॉकडाऊनच्या काळात कडक अंमलबजावणी होणार आहे.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मागील वर्षी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन केल्याने मोठी बाजारपेठ, गावची लोकसंख्या जास्त असताना बोटावर मोजण्याइतके रुग्ण सापडले होते; परंतु यावेळी संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून, बाजारपेठेमुळे गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हळदी येथे कडक लॉकडाऊन करण्यात येणार असून, या काळात दवाखाने, औषध दुकाने, दूध डेअरी सुरू राहणार आहे. त्या व्यतिरिक्त किराणा माल, फळे व भाजीपाला विक्री दुकाने, हॉटेल्स, चहा टपरी, बेकरी, मटन तसेच मत्स्य व्यवसाय व इतर दुकाने पूर्णत: बंद राहतील. बाहेर गावावरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना गावात प्रवेश बंदी असेल, तसेच गावातील मंदिरेदेखील या कालावधीत बंद राहतील. त्याचबरोबर गावातील जे लोक एमआयडीसी किंवा अन्य ठिकाणी कामास आहेत त्यांनी स्वतःची अँटिजन चाचणी करून घेण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास अशा लोकांना कोरोना दक्षता समिती व पोलीस प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.