हेरलेमध्ये लॉकडाऊन कडक अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:51+5:302021-05-05T04:39:51+5:30
कमांडोंच्या धास्तीने ग्रामस्थांनी व मोकाट हिंडणाऱ्या युवकांनी धास्ती घेतली असून घरातून बाहेर पडणे बंद केले आहे तसेच गावात पानटपरीवर ...

हेरलेमध्ये लॉकडाऊन कडक अंमलबजावणी
कमांडोंच्या धास्तीने ग्रामस्थांनी व मोकाट हिंडणाऱ्या युवकांनी धास्ती घेतली असून घरातून बाहेर पडणे बंद केले आहे तसेच गावात पानटपरीवर येऊन पिचकाऱ्या मारणाऱ्या टपोरी युवकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार संपूर्ण बंद होते. गावात कमांडो दाखल होताच रस्त्यावर हिंडणाऱ्या सर्वांची भंबेरी उडाली व त्यांनी तत्काळ आपले घर गाठले. त्यामुळे गावातील सर्व रस्ते, गल्ल्या सामसूम झाल्या. घरातून बाहेर पडण्याचे धाडस कुठल्याही ग्रामस्थांने दाखविले नाही. त्याचा फायदा कोरोना साखळी तोडण्यासाठी होणार आहे. ग्रामपंचायतीने हे सर्व कडक निर्बंध कोरोना साखळी तोडण्यासाठी गावात लादल्यामुळे सूज्ञ ग्रामस्थांतून याचे स्वागत केले जात आहे. ग्रामपंचायतीस ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.