कुरुंदवाडमध्ये कडकडीत बंदला प्रतिसाद * सर्वपक्षीयांच्यावतीने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:56+5:302021-01-08T05:21:56+5:30
दरम्यान, सकाळी येथील सन्मित्र चौकातून सर्वपक्षीय निषेध फेरी काढून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे ...

कुरुंदवाडमध्ये कडकडीत बंदला प्रतिसाद * सर्वपक्षीयांच्यावतीने बंद
दरम्यान, सकाळी येथील सन्मित्र चौकातून सर्वपक्षीय निषेध फेरी काढून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर महामानवाचे अवमानकारक छायाचित्र शेअर केल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. अवमानकारक छायाचित्र शेअर करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी यासाठी सोमवारी रात्री येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून मोर्चेकरांनी मंगळवारी शहर बंदची हाक दिली होती.
सकाळी सन्मित्र चौकातून शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. फेरी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक निरावडे यांनी निवेदन स्वीकारले.
निषेध फेरीत रामदास मधाळे, माजी उपनगराध्यक्ष वैभव उगळे, बाबासो सावगांवे, संजय शिंदे, तानाजी आलासे, उदय डांगे, अनुप मधाळे, सुनील कुरुंदवाडे, संजय कांबळे, अलोक कडाळे, शशिकांत तोबरे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - ०५०१२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे मंगळवारी सकाळी सर्वपक्षीयांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.