शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

ससूनप्रश्नी दोषींना अद्दल घडवू, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:35 IST

''व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल, असे ऑपरेशन नक्कीच करू''

कोल्हापूर : पुण्यातील ससून हॉस्पिटलसारख्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून व्यवस्था खालून वरपर्यंत दुरुस्त करावी लागेल. व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल, असे ऑपरेशन नक्कीच करू, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिले.पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले, ससून हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. अजय तावरे हे सध्या त्या पदावर कार्यरत नव्हते. ससूनमधील रुग्णाचा उंदीर चावून मृत्यू झाल्यानंतर दहा एप्रिल २०२४ रोजीच त्यांना पदमुक्त केले होते. प्राध्यापक म्हणून ते काम करीत होते. रजेवर असतानाही त्यांनी तीन लाख रुपयांच्या हव्यासापोटी रक्त नमुने बदलले आहेत, हे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आ. सुनील टिंगरे यांच्या पत्रातील विनंतीनुसार त्यांना पदोन्नती दिली होती, हे खरे आहे. न्यायालये अशा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालावर विश्वास ठेवून निकाल देत असतात. अशा घटना होऊ लागल्या तर चुकीचा संदेश जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अशा गोष्टींना कधीच पाठीशी घालत नाहीत. अशा प्रकरणातील दोषींवर अतिशय कडकपणाने कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात. अंजली दमानिया यांचे आव्हानही त्यांनी स्वीकारले आहे. अजित पवार यांनी एवढी मोठी घटना असल्यामुळे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने पोलिस आयुक्तांना फोन केला होता. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंत्री म्हणजे ब्रम्हवाक्य नव्हेतुमच्या पत्रावरच डॉ. अजय तावरे यांची पदोन्नती झाली आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, मंत्री म्हणजे ब्रह्मदेव नव्हे. मंत्र्याचा आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. संबंधित अधिकाऱ्यांनीही ते ठरवायचे आहे. चुकीचे असेल तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणेHasan Mushrifहसन मुश्रीफ