पत्नी, मेहुण्याचा अडकित्याने खून, राशिवडे येथील घटना, ‘सीपीआर’मध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:14 PM2020-03-03T18:14:02+5:302020-03-03T18:16:10+5:30

कौटुंबिक वादातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंजाबाई कावणेकर (वय ४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडके (४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. मंजाबाईचा पती सदाशिव खानू कावणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Stress, murder of spouse, tension in 'CPR' incident at Rashtrapati | पत्नी, मेहुण्याचा अडकित्याने खून, राशिवडे येथील घटना, ‘सीपीआर’मध्ये तणाव

पत्नी, मेहुण्याचा अडकित्याने खून, राशिवडे येथील घटना, ‘सीपीआर’मध्ये तणाव

Next
ठळक मुद्देपत्नी, मेहुण्याचा अडकित्याने खूनराशिवडे येथील घटना, ‘सीपीआर’मध्ये तणाव

राशिवडे/कोल्हापूर : कौटुंबिक वादातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंजाबाई कावणेकर (वय ४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडके (४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. मंजाबाईचा पती सदाशिव खानू कावणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंजाबाई राशिवडे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या आहेत. आज, मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली. राशिवडे पोलिसांनी याप्रकरणी सदाशिव खानु कावणेकर (वय ५२) याला ताब्यात घेतले आहे.

हल्लेखोर सदाशिव यांने सुपारी कातरणाºया अडकित्याने हा हल्ला केला. जखमीना नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात आणले. मात्र उपचारादरम्यान दोघाचा मृत्यु झाला. या घटनेने राशिवडे गावावर शोककळा निर्माण झाली आहे.

‘सीपीआर’मध्ये तणाव

राशिवडे येथील दुहेरी खून प्रकरणातील मंजाबाई कावणेकर व केरबा येडके या बहीण-भावांचे मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणले. यावेळी नातेवाइकांनी अपघात विभागासमोर मोठी गर्दी केली. त्यापाठोपाठ भुयेवाडी, आजरा येथील सर्पदंश झालेले आणि विषप्राशन केलेले रुग्णही दाखल झाले. काही वेळाने उपचार सुरू असताना त्यांतील दोन रुग्ण दगावल्याने त्यांच्याही नातेवाइकांनी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. नातेवाइकांचा आक्रोश पाहून बघ्यांची गर्दी झाली. कोण कोणासाठी आला आहे, हे काहीच समजत नव्हते.

खून प्रकरणामुळे अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अनिल गुजर सीपीआर रुग्णालयामध्ये आले. बघ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदोबस्ताला असलेले पोलीस व सीपीआरच्या सुरक्षारक्षकांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर परिसर मोकळा झाला. या घटनांमुळे सीपीआर परिसरात तणाव पसरला होता.

Web Title: Stress, murder of spouse, tension in 'CPR' incident at Rashtrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.