देखावे पाहण्यासाठी जनसागर रस्त्यांवर...
By Admin | Updated: September 7, 2014 00:43 IST2014-09-07T00:42:14+5:302014-09-07T00:43:51+5:30
कोल्हापूर : पावसाची उसंत आणि उद्या, रविवारी सुटीची संधी साधत देखावे पाहण्यासाठी आज,

देखावे पाहण्यासाठी जनसागर रस्त्यांवर...
कोल्हापूर : पावसाची उसंत आणि उद्या, रविवारी सुटीची संधी साधत देखावे पाहण्यासाठी आज, शनिवारी रस्त्यांवर गर्दीचा महापूर लोटला होता. गर्दीतून मोबाईलमध्ये छायाचित्र टिपून घेण्यासाठी वर येणारे हात, गर्दीतून वाट काढण्यासाठी पिपाणी, भोंगे वाजविणारे तरुण, या आवाजाने गर्दीत उमटणारी हास्याची लकेर रात्री उशिरापर्यंत शहरात सर्वत्र उमटत होते.
आज दिवसभर कोसळणारा पाऊस सांयकाळी पाचनंतर बंद झाल्याने देखावे पाहण्यासाठी शहरात रात्री आठनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरीसह शिवाजी पेठेतील देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे काल, शुक्रवारपासून पाहण्यासाठी खुले झाले आहेत. मात्र काल पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची निराशा झाली होती. आज दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने देखावे पाहता येणार नाहीत, असे वाटत असतानाच सायंकाळनंतर पाऊस कमी झाला. त्यामुळे रात्री आठनंतर रस्त्यांवर देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली. रात्री अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतुकींची कोंडी झाली होती. पोलिसांनी विशेष दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी टेहाळणी टॉवर उभारून पोलीस कर्मचारी तैनात होते. रात्री उशिरापर्यंत रस्तेगजबजले होते. (प्रतिनिधी)