भटक्या कुत्र्यांवर ३ वर्षांत तब्बल ४७.५ लाख खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:07+5:302021-06-10T04:18:07+5:30
गडाद यांनी मिळविलेल्या आरटीआय माहितीनुसार गेल्या ३ वर्षांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पर्यायाने त्यांची वाढती संख्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर ...

भटक्या कुत्र्यांवर ३ वर्षांत तब्बल ४७.५ लाख खर्च
गडाद यांनी मिळविलेल्या आरटीआय माहितीनुसार गेल्या ३ वर्षांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पर्यायाने त्यांची वाढती संख्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर बेळगाव महापालिकेने ४५ लाख ५५ हजार ५५६ रुपये खर्च केले आहेत. २०१४-१५ साली शहरातील ३,९४४ भटक्या कुत्र्यांवर २५ लाख ६५ हजार ६०५ रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. २०१७-१८ साली ९७२ भटक्या कुत्र्यांसाठी ६ लाख ९७ हजार रुपये खर्च केले गेले आहेत, तर २०१९-२० साली मनपा व्याप्तीतील १,५९८ भटक्या कुत्र्यांसाठी १४ लाख ९५ हजार ५३१ रुपये खर्ची घालण्यात आले आहेत.
भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना निर्जनस्थळी नेऊन सोडण्यासाठी आलेला वाहतुकीचा खर्च लाखाच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात फक्त भटक्या कुत्र्यांवर खर्च करण्यात आलेल्या पैशाबद्दल भीमाप्पा गडाद यांनी साशंकता व्यक्त केली असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे.