स्ट्रॉबेरीवर ‘अवकळा’

By Admin | Updated: November 15, 2014 00:05 IST2014-11-14T23:39:47+5:302014-11-15T00:05:39+5:30

पावसाने पळापळ : शेतकरी हवालदिल

Strawberries 'Avalala' | स्ट्रॉबेरीवर ‘अवकळा’

स्ट्रॉबेरीवर ‘अवकळा’

सातारा : अवकाळी पावसाच्या हजेरीचा मोठा फटका स्ट्रॉबेरीच्या पिकांवर पडला आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या हंगामात स्ट्रॉबेरी चढ्या दराने बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अचानक पडणाऱ्या या पावसामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. दरम्यान, ऐन नोव्हेंबरात अचानक पडलेल्या पावसामुळे सातारा शहरातही नागरिकांची पळापळ उडाली.
महाबळेश्वर, पाचगणीसह जावळी खोऱ्यात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. स्ट्रॉबेरी हिवाळ्यात येणारे फळ आहे. आॅक्टोबरनंतर या रोपांना स्ट्रॉबेरीची फळे लागतात. आता शेतात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे फळ दिसू लागले होते. यंदा थंडीचा मोसम व्यवस्थित आल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले राहणार, असा शेतकऱ्यांचा कयास होता. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी धास्तावला होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे फळ शेतातच खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरणही स्ट्रॉबेरीसाठी घातक असते. स्ट्रॉबेरीत अ, ब, क ही जीवनसत्त्व आढळतात. त्यात १०.५ टक्के ग्लुकोजचे प्रमाण असते. अल्प अ‍ॅसिडिक लेवल असलेल्या या फळात सुमारे २०० बिया असतात. शरीरातील विषारी द्रव्य नष्ट करण्यासाठी या बिया उपयुक्त असतात. गुलाब वर्गीय असलेले हे एकमेव थंडीत येणारे फळ आहे. मोठी मागणी असताना आणि दरही चांगला असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आला आहे.

द्राक्ष उत्पादक अडचणीत
सातारा तालुक्यासह कोरेगाव, वाई, भुर्इंज, मायणी या परिसरातही पावसाने हजेरी लावली. मायणी भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचेही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादकांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, सातारा शहरात सकाळपासून कधी भुरभूर तर कधी सरी येत असल्याने नागरिकांना स्वेटरबरोबरच रेनकोट घेऊन बाहेर पडावे लागले.

Web Title: Strawberries 'Avalala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.