ऊसशेती तांबेऱ्याच्या विळख्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:17 IST2018-08-06T00:17:01+5:302018-08-06T00:17:05+5:30

ऊसशेती तांबेऱ्याच्या विळख्यात !
श्रीकांत ºहायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : संपूर्ण राधानगरी तालुक्यासह, करवीर तालुक्यात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीमधील उभे ऊसपीक बºयाच ठिकाणी धोकादायक स्थितीत दिसत आहे. ऊसपिकावर पडलेला तांबेरा कसा आटोक्यात आणयचा या प्रश्नाने शेतकºयांना ग्रासले आहे. ऊस शेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली असल्याचे यावर्षी ऊस उत्पादनात २० टक्के घट येईल, असा शेतीतज्ज्ञांचा अंदाज आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकरीच निसर्गाच्या अस्मानी संकटात सापडला आहे .
ऊसपीक हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख शेतीपीक म्हणून ओळखले जाते. कारण जिल्ह्याच्या कानाकोपºयांत ऊसपिकाची लागवड झालेली दिसते. त्यामुळे बहुतांशी शेतकºयाचे जीवनमान हे ऊसशेतीवर अवलंबून आहे; पण असे असले तरी कमी खर्चाची, कमी कष्टाची शेती म्हणजे ऊसशेती ही ओळख आता ऊस शेतकºयांसाठी कालबाह्य ठरली आहे. नवनवीन प्रयोग राबवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे पण वेळोवेळी शेतीवर कोसणाºया अस्मानी संकटाने शेतकरी खचला जात आहे. यावर्षी तर ऊस शेतीवर एक भले मोठे संकटच कोसळले आहे. संपूर्ण ऊसशेती तांबेरा रोगाच्या विळख्यात सापडली आहे. उत्पादन घटीबरोबरच जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उसाचा हिरवा पाला हा शेतकºयांच्या पाळीव दुभत्या प्राण्यांना वैरण म्हणून उपयोगी होतो पण हा पाला कुजल्याने शेतकरी अडचणीत आहे.
उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग हा बुरशीमुळे होत असतो. उसाच्या पानावर सुरवातीला तांबडे टिपके पडतात नंतर सदर टिपक्यांचा आकार वाढत जातो उसाच्या पानांचा भुगा झालेला आढळतो. ऊसपिकाची पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी पानेच खराब झाल्याने ऊसरोपांतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया खंडित होण्याच्या मार्गावर असते. त्याचा फटका ऊस धाटाची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांना तांबेरा रोगाच्या सुलतानी संकटाने ग्रासले आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण ऊसशेतीचा प्लॉट खराब झालेले पाहण्यास मिळत आहेत. तांबेरा रोगावर सद्य:स्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात या विवंचनेत शेतकरी असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
सततचा रासायनिक खतांचा वापर, नवीन संकरित ऊस जाती, उसाच्या सरीतील अंतर कमी, युरिया खतांचा अधिक वापर यामुळे ऊस पिकावर तांबेरा रोग पडला आहे. सद्य:स्थितीत तांबेरा कमी होण्यासाठी पावसाची उघडीप व औषध फवारणी आहे; पण असे असले तरी उसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने औषध फवारणी कशी व कोठे-कोठे करायची हे मोठे आव्हान शेतकºयांच्या समोर आहे पण तरीही औषध फवारणी करावयाची झाल्यास डायथेन, क्लीक्झिन अशा फवारण्या केल्या नंतर तांबेरा काही प्रमाणात नियंत्रणात आणता येतो, असे शेतीतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.