‘मोलॅसिस’ विक्री टेंडर तत्काळ थांबवा

By Admin | Updated: February 26, 2016 01:25 IST2016-02-26T00:41:31+5:302016-02-26T01:25:35+5:30

रावळ : ‘भोगावती’ कारखान्याला आदेश

Stop selling tender for 'molasses' immediately | ‘मोलॅसिस’ विक्री टेंडर तत्काळ थांबवा

‘मोलॅसिस’ विक्री टेंडर तत्काळ थांबवा

आमजाई व्हरवडे : मोलॅसिसचे विक्री टेंडर तत्काळ थांबविण्याचे आदेश साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी गुरुवारी परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याला दिल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती.
‘भोगावती’च्या सात हजार टन मोलॅसिस विक्रीत ७० लाखांचा तोटा असल्याने हे विक्री टेंडर थांबविण्याची मागणी ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने साखर सहसंचालक रावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत ‘भोगावती’ला गुरुवारीच रावळ यांनी मोलॅसिसच्या विक्रीबाबतचे टेंडर थांबविण्याचे आदेश दिले.
जवाहर साखर कारखान्याने १ फेब्रुवारीला विक्री केलेला दर प्रतिटन ६२०० रुपये होता. कुंभी साखर कारखान्याने ८ फेब्रुवारीला केलेल्या मोलॅसिसचा दरही प्रतिटन ६२०० रुपयेच होता. मग २९ जानेवारीला विक्री टेंडर केलेला ‘भोगावती’चा दर ५३०० रुपयेच का? त्यामुळे ‘भोगावती’च्या संचालक मंडळाने ७० लाखांचा अपहार करण्याच्या उद्देशाने प्रतिटन ९०० रुपये कमी दराने मोलॅसिस विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे टेंडर रद्द करावे, असे चरापले यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या निवेदनावर सदाशिवराव चरापले यांच्यासह हिंदुराव चौगले, संजय पाटील (कसबा तारळे), शंकरराव पाटील (हसूर), भीमराव पाटील (वाशी), यशवंत पाटील (हिरवडे), वसंत पाटील (कुरुकली), ए. डी. पाटील (गुडाळ), सुभाष पाटील (सिरसे), सुभाष जाधव (पिंपळवाडी), विठ्ठल भोपळे (भोपळवाडी), आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Stop selling tender for 'molasses' immediately